पुण्याच्या मुलांची दमदार विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 September 2019

-किशाेर गटाच्या राज्य खाे-खाे स्पर्धेला सुरवात

-पुणे संघाच्या मुलांनी बीडचा 1 डाव 15 गुणांनी धुव्वा उडवून दणदणीत विजयी सलामी दिली. 

-प्रथम संरक्षण करणाऱ्या पुणे संघाने केवळ एकच गुण गमावला. त्यांच्याकडून रोशन कोळी आणि भावेश माशेरे यांनी 3.30 मिनिटे बचाव केला.

-चेतन बिकाच्या धारदार आक्रमणाने पुणे संघाने तब्बल 18 गुण मिळवून 17 गुणांची आघाडी

पुणे - पुणे संघाच्या मुलांनी शुक्रवारपासून धुळे येथे सुरू झालेल्या किशोर-किशोरी गटाच्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेत बीडचा 1 डाव 15 गुणांनी धुव्वा उडवून दणदणीत विजयी सलामी दिली. 
प्रथम संरक्षण करणाऱ्या पुणे संघाने केवळ एकच गुण गमावला. त्यांच्याकडून रोशन कोळी आणि भावेश माशेरे यांनी 3.30 मिनिटे बचाव केला. त्यानंतर चेतन बिकाच्या धारदार आक्रमणाने पुणे संघाने तब्बल 18 गुण मिळवून 17 गुणांची आघाडी घेतली. बीड संघाला ही आघाडी झेपली नाही. त्यांचे आक्रमण दुसऱ्या डावातही निष्प्रभ ठरले. त्यांना केवळ दोनच गुण टिपता आले. दुसऱ्या डावात पुण्याकडून अमित गायकवडाने 3, ओंकार थोरातने 2.50 मिनिटे बचाव केला. 
त्यापूर्वी, सकाळी झालेल्या सामन्यात मुलींच्या गटात सांगलीने नगरचा 11-6 असा एक डाव 5 गुणांनी पराभव केला. रत्नागिरीने मुंबईवर 9-6 असा एक डाव 3 गुणांनी विजय मिळविला. मुलांच्या गटात मुंबईने धुळे संघाचा चुरशीच्या लढतीत 14-13 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. धुळे संघाला दुसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला. त्यांना उस्मानाबादने 19-10 असे एक डाव 9 गुणांनी पराभूत केले. 


​ ​

संबंधित बातम्या