राज्य कॅरममध्ये पुणे विजेते
महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेच्या वतीने आयोजित आंतरराज्य-जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने पुरुष गटात विजेतेपद मिळविले. निर्णायक साखळी लढतीत पुणे संघाने मुंबईवर 2-1 असा विजय मिळवून गतवर्षीच्या अंतिम पराभवाचा वचपा काढला.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कॅरम संघटनेच्या वतीने आयोजित आंतरराज्य-जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने पुरुष गटात विजेतेपद मिळविले. निर्णायक साखळी लढतीत पुणे संघाने मुंबईवर 2-1 असा विजय मिळवून गतवर्षीच्या अंतिम पराभवाचा वचपा काढला.
महंमद घुफ्रान याने मुंबईला विजयी सुरवात करून दिली; पण नंतर गणेश तावरे-रहिम खान या पुण्याच्या जोडीने दुहेरीची लढत जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या एकेरी लढतीत माजी जगज्जेत्या योगेश परदेशीने मुंबईच्या झैद अहमदचा पराभव करून पुण्याला विजेतेपद मिळवून दिले.
रत्नागिरी संघास तिसरा क्रमांक मिळाला. त्यांनी मुंबई उपनगर संघावर विजय मिळविला. दरम्यान, पुरुष एकेरीत नागसेन एटांबे, शरीफ शेख, महंमद घुप्रान, मंगेश पंडित, अभिषेक चव्हाण, विवेक कांबळे यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.