चीन ओपन स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी

वृत्तसंस्था
Tuesday, 6 November 2018

यंदाच्या वर्षात प्रत्येक मोठया स्पर्धेत विजेतेपदापासून दूर राहिलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत 30 व्या स्थानावर असलेल्या कोसेत्सकायावर विजय मिलवित दुसऱ्या फेरीत धडक मारली. 

बिजिंग : भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत रशियाच्या इव्हजेनिया कोसेत्सकायावर सहज विजय मिळविला. यंदाच्या वर्षात प्रत्येक मोठया स्पर्धेत विजेतेपदापासून दूर राहिलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत 30 व्या स्थानावर असलेल्या कोसेत्सकायावर विजय मिळवित दुसऱ्या फेरीत धडक मारली. 

यंदाच्या मोसमात सिंधूला पाचवेळा अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. जपानची अव्वल टेनिसपटू नोझोमी ओकुहारा आणि सिंधू एकाच गटात असून उपांत्य फेरीत त्या एकमेकींविरुद्ध लढतील. मात्र, त्यासाठी त्यांना आधीच्या प्रत्येक फेरीत विजय मिळविणे आवश्यक आहे. 

ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेती स्पेनची कॅरोलिना मारिन आणि जपानची अकाने यामागुची या दोघी एका गटात असून यांच्यातही रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. भारताची दुसरी बॅडमिंटनपटू सिंधूशिवाय वैष्णवी रेड्डी जक्का सर्वांचे लक्ष वेधण्यास सज्ज झाली आहे. तिचा पहिला सामना बुधवारी थायलंडच्या पोरनपावी चोचुवॉँग हिच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीमध्ये भारताच्या आशा प्रामुख्याने किदंबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय या दोन अव्वल बॅडमिंटनपटूंवर आहेत.


​ ​

संबंधित बातम्या