विश्वविजेता कुस्तीपटू राहुल आवारे बांधणार प्रशिक्षकांच्या मुलीशी लग्नगाठ

सागर आव्हाड
Saturday, 5 October 2019

महाराष्ट्राचा लाडका मल्ल,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता,पोलीस उप अधीक्षक (Dysp) पै.राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर  2019 रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या कु.ऐश्वर्या काकासाहेब पवार हिच्याशी पै.राहुल बाळासाहेब आवारे यांचा विवाह नक्की करण्यात आला असून येत्या 9 ऑक्टोबर 2019 रोजी साखरपुडा कार्यक्रम होईल.

अर्जुनवीर काकासाहेब पवार हे पै.राहुल आवारे याचे गुरु असून कै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर राहुलवर पुत्रवत प्रेम त्यांनी केले.

पै.राहुल आवारे याने नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक इतिहास रचला.महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम वर्ग नोकरी प्रदान करुन त्याच्या कारकीर्दीला गौरव यापुर्वीच केला आहे.राहुल सध्या Dysp प्रशिक्षण घेत आहे.

​ ​

संबंधित बातम्या