World Cup 2019 : पावसामुळे सामना लांबल्यास नियम काय सांगतात

सुनंदन लेले
Tuesday, 9 July 2019

भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आल्यावर चर्चेला उधाण चढले की सामन्यात नक्की होणार काय?

भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आल्यावर चर्चेला उधाण चढले की सामन्यात नक्की होणार काय?

* सामन्याच्या निर्धारीत वेळेपेक्षा दोन तास खेळ उशिरापर्यंत चालू ठेवला जाऊ शकतो.

* पहिल्यांदा पावसाने विश्रांती घेतल्यावर पंच कसेही करून कमीतकमी 20 षटकांचा सामना पूर्ण करायचा प्रयत्न करणार. 

* पावसाने विश्रांती घेतलीच नाही आणि खेळ झाला नाही तर राखीव दिवशी खेळ पुढे चालू होईल... नव्याने सामना चालू होणार नाही.

* म्हणजेच मंगळवारी सामना पावसामुळे पुढे चालू झाला नाही तर बुधवारी न्युझिलंड संघ खेळ पुढे चालू करेल.

थोडक्यात सांगायचे तर 20 षटकांचा सामना झाला तर भारताला 20 षटकात 148 धावा काढाव्या लागतील. पण जर सामना मंगळवारी पुढे चालू झाला नाही तर बुधवारी त्याच धावफलकावरून सामना पुढे चालू होईल आणि भारताला न्युझिलंड उभे करेल ते आव्हान पेलायची समान संधी मिळेल. अर्थातच पावसाने परत हजेरी लावली आणि खेळातील तास वाया गेले तर डकवर्थ ल्युईस नियम लागू होईल.


​ ​

संबंधित बातम्या