'राजमाता जिजाऊ' संघ शालेय क्रिकेट स्पर्धेत अजिंक्‍य!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

वेगवान गोलंदाज पुलकेश हलमुनी आणि फिरकी गोलंदाज हृषीकेश बारणे यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.

पिंपरी : राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे अहमदनगर येथे आयोजित शालेय विभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये 19 वर्षांखालील मुलांच्या गटात भोसरीच्या राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाने गोलंदाजीच्या जोरावर अहमदनगर ग्रामीण संघाला हरवून अजिंक्‍यपद पटकाविले. 

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करताना राजमाता जिजाऊ संघाने अहमदनगर ग्रामीण संघावर एक षटक आणि चार चेंडू राखून मात केली. अहमदनगर ग्रामीण संघाने सर्व गड्यांच्या मोबदल्यात आठ षटकांमध्ये 60 धावांचे लक्ष्य ठेवले.

- बॅडमिंटनवरून लक्ष दूर झाल्याचे म्हणणे चुकीचे! - सिंधू

राजमाता जिजाऊ संघाने हे आव्हान बिनबाद पूर्ण केले. रोहित हाडके याने नाबाद 37, तर आदित्य एकशिंगे याने नाबाद 20 धावा केल्या. वेगवान गोलंदाज पुलकेश हलमुनी आणि फिरकी गोलंदाज हृषीकेश बारणे यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

- हृदयस्पर्शी गुडबाय! सचिनसह त्याच्या चाहत्यांच्याही अश्रूंचा बांध फुटला

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे, खजिनदार अजित गव्हाणे, सचिव विश्‍वनाथ कोरडे, विश्‍वस्त प्रताप खिरीड यांनी संघाचे अभिनंदन केले.

- कसोटी सामन्यांमध्ये होणारे हे नुकसान लक्षात कोण घेतो?


​ ​

संबंधित बातम्या