सेम कपिल देव! रणवीरच्या वाढदिवशीच 83मधील लूक रिलीज
वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019
रणवीरसिंगने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी खूप सुंदर भेट दिली आहे. त्याने 83 या चित्रपटातील त्याचा कपिल देवचा लूक रिलीज केला आहे.
नवी दिल्ली : रणवीरसिंगने त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी खूप सुंदर भेट दिली आहे. त्याने 83 या चित्रपटातील त्याचा कपिल देवचा लूक रिलीज केला आहे.
83 या चित्रपटात तो कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. त्याने या फोटो सोशल मीडियावर शेअर करत ''On my special day, here's presenting THE HARYANA HURRICANE KAPIL DEV'' असे कॅप्शन दिले आहे.
83 हा चित्रपट 1983च्या विश्वकरंडकावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर व्यतिरिक्त आर. बद्री, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, पंकज त्रिपाठी या कलाकारांचाही समावेश आहे.