मुंबई इंडियन्सच्या 'या' खेळाडूवर दोन वर्षांची बंदी

वृत्तसंस्था
Thursday, 20 June 2019

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा रसिक सलाम याच्यावर बीसीसीआयने वय चोरल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघातून वगळण्यात आले आहे. 

मुंबई : मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा रसिक सलाम याच्यावर बीसीसीआयने वय चोरल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघातून वगळण्यात आले आहे. 

इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी निवडलेल्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे. आता त्याच्या जागी प्रभात मोर्यला संधी देण्यात आली आहे. 

बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून त्याने वयचोरी केल्याचे स्पष्ट केले आणि त्याच्यावर बंदी घातली. रसिक जम्मू काश्मीरचा असून त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता. त्याला ममुंबईने 20 लाख रुपये देऊन करारबद्ध केले होते.


​ ​

संबंधित बातम्या