World Cup 2019 : जेव्हा कोणी नाही, तेव्हा 'सर' जडेजाच!
41 चेंडूंचा सामना करताना जडेजाने या खेळीमध्ये 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. शेवटचे वृ्त्त हाती आले तेव्हा जडेजा 59 धावा (48 चेंडू) आणि धोनी 30 धावा (56 चेंडू) खेळत होते. भारतास अजून 36 चेंडूत 62 धावांची आवश्यकता आहे.
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : भारताची प्रमुख फलंदाजांची फळी कोसळल्यानंतर संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावले. आणि 'मी अजून हरलेलो नाही' हा इशाराच जणू न्यूझीलंडच्या संघाला दिला.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सुरूवातीला हार्दिक पंड्याला साथीला घेत छोटीशी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात पंड्या झेलबाद झाला. त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या जडेजाने एकेरी, दुहेरी आणि अधूनमधून चौकार-षटकार खेचत अर्धशतकी खेळी साकारली.
41 चेंडूंचा सामना करताना जडेजाने या खेळीमध्ये 3 चौकार आणि 3 षटकार लगावले. शेवटचे वृ्त्त हाती आले तेव्हा जडेजा 59 धावा (48 चेंडू) आणि धोनी 30 धावा (56 चेंडू) खेळत होते. भारतास अजून 36 चेंडूत 62 धावांची आवश्यकता आहे.
The sword twirl comes out ⚔️
Ravindra Jadeja brings up a brilliant fifty from just 39 balls
He's keeping India in this game - can he take them over the line?#INDvNZ | #CWC19 | #TeamIndia pic.twitter.com/WWJDgInWaE
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 10, 2019