हार्दिक पंड्याच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट करतोय ऋषभ पंत!
उर्वशीचे नाव या अगोदर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याशी जोडले जात होते.
मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं हे जगजाहीर आहे. एखादा क्रिकेटपटू एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे किंवा एखादी अभिनेत्री क्रिकेटपटूच्या प्रेमात पडलीय, हे आता नवे राहिले नाही. उलट हा आता ट्रेंड बनला असल्याचे काही उदाहरणांवरून जाणवते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप
आताही एका क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रीचे अफेअर सुरू असलेल्या चर्चेने जोर धरला आहे. मैदानावरील सुमार कामगिरीमुळे भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या चर्चेत आहे. मात्र, त्याची मैदानाबाहेरील कामगिरीमुळे तो चर्चेत आला आहे.
Life is simple . So wake up ... give life your best shot ... Repeat pic.twitter.com/cDx0oWLreG
— Rishabh Pant (@RishabhPant17) July 3, 2019
- Happy Birthday Rajinikanth : 'दक्षिणेतील देव' आता दिसणार 'दरबार'मध्ये
रिषभ आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हे दोघे मंगळवारी (ता.10) जुहूमधील 'इस्टेला हॉटेल'मध्ये एकत्र डिनर करताना दिसल्याबाबतचे अधिकृत वृत्त 'स्पॉटबॉय'ने दिले. आणि अफेअरबाबतच्या चर्चांना सुरवात झाली.
Today, acting is definitely my main focus. I am happy that with #Pagalpanti, I am getting a chance to prove my acting abilities - Urvashi Rautela @UrvashiRautela pic.twitter.com/zUTgU6rXD4
— URVASHI RAUTELA FC (@UrvashiKiDuniya) November 16, 2019
- Tanhaji : 'शंकरा'नंतर तान्हाजी सिनेमाचं 'माय भवानी' गाणं एकदा पाहाच!
उर्वशीचे नाव या अगोदर भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याशी जोडले जात होते. हार्दिक आणि उर्वशी हे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. एका पार्टीदरम्यान त्यांची भेट झाली होती. मात्र, या सर्व अफवा असल्याचे उर्वशीने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यानंतर हार्दिकचे नाव नताशा स्तांकोविकशी जोडले गेले.
Music to go with me on my road to recovery pic.twitter.com/34jR8xfEv3
— hardik pandya (@hardikpandya7) December 7, 2019
मात्र, आता उर्वशी आणि ऋषभ हे एकमेकांना डेट करत असल्याचे दिसत आहे. या वृत्ताला त्या दोघांपैकी कोणीही अजून दुजोरा दिला नाही.
- प्रिया म्हणाली 'आय लव्ह यु मिस्टर कामत', शेअर केले खास फोटो !
मिस दिवा 2015 ची विजेती आणि मिस युनिव्हर्स 2015 मध्ये उर्वशीने भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच तिने भाग जॉनी, सनम रे, हेट स्टोरी 4 या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. गेल्या महिन्यात उर्वशीने अभिनय केलेला पागलपंती हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, त्याला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश मिळाले नाही. उर्वशी लवकरच तमिळ चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.
Happiness is hanging off a silk Tag someone who loves Aerial .
.
.
.
.#love #Aerialsilks #AerialYoga #AerialArts #Aerial #dance #Fitness @TSeries @KabirSinghMovie pic.twitter.com/cCoaqhNopq— URVASHI RAUTELA(@UrvashiRautela) July 14, 2019