पंतने शेअर केले गर्लफ्रेंडसोबतचे बर्फातले फोटो, एकदा बघाच
नुकतेच हार्दिक पंड्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याची गर्लफ्रेंड नाताशासोबत साखरपुडा करत सर्वांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता रिषभ पंतनेसुद्धा त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचे बर्फाने आच्छादलेल्या डोंगरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
नवी दिल्ली : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी आपापल्या पार्टनर आणि कुटुंबासोबत वेगवेगळी डेस्टिनेशन गाठली. नुकतेच हार्दिक पंड्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याची गर्लफ्रेंड नाताशासोबत साखरपुडा करत सर्वांना सुखद धक्का दिला. त्यानंतर आता रिषभ पंतनेसुद्धा त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतचे बर्फाने आच्छादलेल्या डोंगरातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पंतनेही सर्वांप्रमाणेच मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरे केले. त्याने आपली गर्लफ्रेंड ईशासोबत हे सेलिब्रेशन केले आहे. त्याने त्यांचा फोटो शेअर करत त्याला ''जेव्हा मी तुझ्यासोबत असतो तेव्हा मी स्वत:ला जास्त आवडतो,'' असे कॅप्शन दिले आहे. ईशानेसुद्धा त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत ''5th year and counting'' असे कॅप्शन दिले आहे.
नताशा वहिनीचं स्वागत करताना कृणाल म्हणाला, "वेडेपणा करण्यासाठी...''