बाराशेव्या विजयासाठी फेडररचा कडवा संघर्ष 

वृत्तसंस्था
Friday, 10 May 2019

माद्रिद : स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने कारकिर्दीत बाराशेवा विजय संपादन केला; पण त्यासाठी त्याला कडवा संघर्ष करावा लागला. माद्रिद एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे कडवे आव्हान 6-0, 4-6, 7-6 (7-3) असे परतावून लावले. त्याला दोन मॅचपॉइंट वाचवावे लागले. पहिला सेट केवळ 18 मिनिटांत खिशात टाकल्यानंतर फेडररला झगडावे लागले. 

फेडरर 37 वर्षांचा आहे. तो 2016 नंतर प्रथमच क्‍ले कोर्टवर खेळत आहे. मॉंफीसने परिणामकारक खेळाच्या जोरावर फेडररला बचाव करण्यास भाग पाडले होते. अशावेळी फेडररने सावरून आक्रमक खेळ केला. तिसऱ्या सेटमध्ये 5-6 अशा स्थितीस सर्व्हिसवर फेडरर पिछाडीवर होता; पण त्याने पहिल्या मॅचपॉइंटला फोरहॅंड विनर मारला, तर दुसऱ्या वेळी भक्कम सर्व्हिसच्या जोरावर आव्हान राखले. मॉंफीसविरुद्ध फेडररने 14 लढतींत नववा विजय मिळविला. यातील शेवटच्या चार लढती क्‍ले कोर्टवर झाल्या आहेत. फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून, आता त्याच्यासमोर डॉमनिक थीमचे आव्हान असेल. 

जोकोविच विजयी 

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फ्रान्सच्या जेरेमी चार्डीला 6-1, 7-6 (7-2) असे हरवून आगेकूच केली. जोकोविचने अद्याप एकही सेट गमावलेला नाही. 47व्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याने टायब्रेक दोन गुणांच्या मोबदल्यात जिंकला. जोकोविचसमोर क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचे आव्हान असेल. चिलीचने सर्बियाच्या लाझ्लो जेरेला 4-6, 6-3, 6-2 असे हरविले. 

​ ​

संबंधित बातम्या