World Cup 2019 : रोहित शर्माने सोडली भारतीय संघाची साथ
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्व सहकाऱ्यांपेक्षा आधीच भारताता परतला आहे. भारतीय संघातील इतर सर्व खेळाडू रविवारी भारतात परतणार आहेत मात्र, रोहित सर्मा शुक्रवारीच भारतात परतला आहे.
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा संघातील सर्व सहकाऱ्यांपेक्षा आधीच भारताता परतला आहे. भारतीय संघातील इतर सर्व खेळाडू रविवारी भारतात परतणार आहेत मात्र, रोहित सर्मा शुक्रवारीच भारतात परतला आहे.
रोहित शर्मा मुंबई विमानतळावर त्याची पत्नी रितीका आणि मुलगी समायरा यांच्यासह दाखल झाला. तो स्वत: एसयुव्ह चालवत घरी गेला. त्यावेळी त्याला चाहत्यांनी वेढले.
भारतीय संघातील इतर खेळाडू 14 तारखेला इंग्लंडवरुन निघतील आणि त्याचदिवशी मुंबईत दाखल होतील. ''सगळे खेळाडू 14 तारखेला एकत्रच इंग्लंडहून निघतील,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले होते.