World Cup 2019 : धोनी झाला आता कोहलीचा 'हा' रेकॉर्ड मोडून रोहित पहिल्या क्रमांकावर

वृत्तसंस्था
Sunday, 16 June 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला. त्यानंतर धोनी झाला आणि रोहितने विश्वकरंडकात भारत पाक सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

वर्ल्ड कप 2019 :
मॅंचेस्टर :
 भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा षटकारांचा विक्रम मोडीत काडून रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आला. त्यानंतर धोनी झाला आणि रोहितने विश्वकरंडकात भारत पाक सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने विश्वकरंडकात भारत-पाक सामन्यात एका सामन्यात विराट कोहलीचा सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. आता भारत आणि पाकिस्तानकडून विश्वकरंडकात एकमेकांच्या विरूद्ध सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू रोहित शर्मा आहे. 2015च्या विश्वकरंडकात विराट कोहलीने शतकी खेळी खेळताना 107 धावा काढल्या होत्या. आजच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम मोडीत काढला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रोहित शर्मा 125 धावांवर खेळत आहे.

दरम्यान, हसन अलीच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा रोहितला षटकारांचा बादशहा बनवून गेला. भारताच्या खेळाच्या सहाव्या षटकात त्याने चेंडून सीमारेषेच्या बाहेर टोलावला आणि या षटकाराने रोहितने धोनीचा सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला. या षटकारासह रोहित भारताकडून एकदिवसीय सामन्यात सार्वाधिक षटकार ठोकणार खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने एकदिवसीय सामन्यात एकूण 355 षटकार ठोकले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या