World Cup 2019 : धोनी, केदारवर सचिन निराश 

वृत्तसंस्था
Sunday, 23 June 2019

भारताचा माजी विक्रमवीर खेळाडू सचिन तेंडुलकर याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : भारताचा माजी विक्रमवीर खेळाडू सचिन तेंडुलकर याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.

अफगाणिस्तान गोलंदाज भारतीय फलंदाजांना जखडून ठेवत असताना धोनी, केदारच्या फलंदाजीत कुठेही सकारात्मकता नव्हती, असे सचिनने म्हटले आहे. त्यांची भागीदारी खूप संथ झाली. आपण फिरकीची 39 षटके खेळली आणि 119 धावा केल्या. फलंदाजीच्या आघाडीवर आपण येथेच कमी पडले, असे सचिनचे म्हणणे आहे. मधली फळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर दडपण ठेवण्यात कमी पडली असेही सचिन म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या