सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियन कंपनीविरोधात 30 लाख डॉलरचा दावा

वृत्तसंस्था
Friday, 14 June 2019

क्रीडा साहित्यावर नाव आणि छबी वापरल्यानंतरही करारानुसार त्याचा मोबदला न दिल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट बॅट तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कंपनीवर तीन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केल्याचे वृत्त आहे.

मेलबर्न : क्रीडा साहित्यावर नाव आणि छबी वापरल्यानंतरही करारानुसार त्याचा मोबदला न दिल्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट बॅट तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कंपनीवर तीन दशलक्ष डॉलरचा दावा दाखल केल्याचे वृत्त आहे. भारतीय वंशाचे कृणाल शर्मा हे या कंपनीचे सह मालक आहेत. 

स्पार्टन स्पोर्टस्‌ हे या कंपनीचे नाव असून तिची स्थापना 2016 मध्ये झालेली आहे. गेल्या सप्टेंबरपासून सचिन तेंडुलकर या कंपनीशी करार केलेला आहे. सचिनने या कंपनीत काही काही प्रमाणात गुंतवणूकही केलेली आहे तसेच तो कंपनीच्या सल्लागार समितीचा प्रमुख सदस्यही होता, परंतु कोट्यावधींच्या दिवाळखोरीत ही कंपनी गेल्यानंतर सचिनने सचिनने या कंपनी असलेले नाते संपुष्टात आणले होते. आणि पुढील उत्पादनासाठी आपले नाव वापरू नये अशी सुचनाही केली होती तरीही बॅटवर नाव वापरल्यामुळे सचिनने या कंपनीविरूद्ध ऑस्ट्रेलियातील न्यायालयात दिवाणी दावा केला आहे. 

त्याच बॅटने वॉर्रनचे शतक 
ऑस्ट्रेलियाचाचा तडाखेंबद सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच स्पार्टन कंपनीची बॅट वापरतो. बुधवारी पाकिस्ताविरूद्ध झालेल्या सामन्यात वॅर्नरने 107 धावांची निर्णायक खेळी केली होती. या कंपनीशी वॉर्नरने नुकताच करार केलेला आहे. परंतु या कंपनीने वॉर्नरला त्याचा मोबदला दिला की नाही याबाबतच माहिती उपलब्ध झालेली नाही.

करारानुसारची रक्कम देण्याबाबत अडचण येणार नाही, त्यांना करार पूर्ण करावाच लागेल, असे वॉर्नरचे व्यवस्थापक जेम्स एर्स्किन यांनी सांगितले, परंतु त्याने जर रक्कम दिली नाही तर सचिनप्रमाणे आम्हालाही पाऊल उचलावे लागेल, याचेही संकेत एर्स्किन यांनी दिले. 

स्पार्टन कंपनीच्या बॅट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्‍लार्क, महेंद्रसिंग धोनी आणि इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यांनी वापरलेल्या आहेत तर करारानुसार रक्कम न दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मिशेल जॉन्सन आणि ज्यो बर्न्स यांनीही दावा केलेला आहे.


​ ​

संबंधित बातम्या