World Cup 2019 : सचिन म्हणतो, 'हे' दोघे संघात हवेच

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

भारतीय संघासमोर आज न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात जागा द्यावी असा सल्ला सचिनने दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने या दोघांना संघात घ्यावे असे म्हटले आहे.

लंडन : न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघात कोण असेल यावरून तर्कवितर्क लावले जात असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या सामन्यासाठी भारतीय संघात महंमद शमी आणि रवींद्र जडेजा यांना घेतलेच पाहिजे असे म्हटले आहे.

भारतीय संघासमोर आज न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात जागा द्यावी असा सल्ला सचिनने दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने या दोघांना संघात घ्यावे असे म्हटले आहे.

सचिन म्हणाला, की भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अंतिम संघासाठी रवींद्र जडेजा हा एक चांगला पर्याय आहे. जर दिनेश कार्तिक संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असेल तर त्याच्या जागी रविंद्र जाडेजा चांगला पर्याय आहे. त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी संघासाठी उपयुक्त ठरु शकते. उपांत्य फेरीसारख्या महत्वाच्या सामन्यात तुम्हाला असा पर्याय संघात असणे गरजेचे आहे. शमीलाही उपांत्य सामन्यात संघात स्थान मिळायला हवे. कारण याच मैदानावर भारताने वेस्ट इंडिजवर मात केली होती, आणि शमीने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे उपांत्य सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळायला हवे, तो तुम्हाला महत्त्वाच्या विकेट काढून देऊ शकतो.

​ ​

संबंधित बातम्या