सचिन म्हणतोय, "कांबळ्या, हे बघ मला काय सापडलं!''

वृत्तसंस्था
Saturday, 3 August 2019

सचिन तेंडुलकरने हा फोटो ट्वीट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बालपणीचा मित्र आणि क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यासोबतचा एक फोटो आज (शनिवार) ट्विटरवर पोस्ट केला. शालेय वयात क्रिकेट खेळतानाचा एक जुना फोटो सचिनला मिळाला. त्याला सचिनने मस्तपैकी एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. त्याने म्हटले आहे, "कांबळ्या, हे बघ मला काय सापडलं!''

सचिन तेंडुलकरने हा फोटो ट्वीट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. शालेय जीवनातल्या विनोद कांबळी सोबतच्या आठवणी तो सार्वजनिक मंचावर नेहमी सांगत असतो. आज मात्र त्याने फोटो ट्वीट करत एक जुनी आठवण शेअर केली आहे.

त्याने दिलेल्या कॅप्शनवरून विनोद कांबळीबरोबर असलेली सचिनची मैत्री किती घट्ट आहे, याची प्रचिती येते.

काही वर्षांपूर्वी सचिन आणि विनोदमध्ये थोडे विप्तुष्ट आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात त्यांनी सारा दुरावा बाजूला सारत आपली मैत्री आणखी घट्ट केली.


​ ​

संबंधित बातम्या