माऊंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर १० वर्षीय गिर्यारोहकाने फडकाविला तिरंगा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 August 2019

पुणे : युरोप खंडातील सर्वाेच्च शिखर माऊंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर पिंपरी चिंचवड मधील १० वर्षीय बाल गिर्यारोहक साई कवडे याने इतर सहकारी गिर्यारोहकांसमवेत ७३ फुटी तिरंगा फडकाविला.

पुणे : युरोप खंडातील सर्वाेच्च शिखर माऊंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर पिंपरी चिंचवड मधील १० वर्षीय बाल गिर्यारोहक साई कवडे याने इतर सहकारी गिर्यारोहकांसमवेत ७३ फुटी तिरंगा फडकाविला.

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.​उद्या 15 ऑगस्टला एल्ब्रुसच्या शिखर माथ्यावर तिरंगा व भगवा ध्वज फडकविला जाणार आहे.

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना प्रेरणा देण्यासाठी सर्वांनी खास कोल्हापुरी फेटा बांधून तिरंगा ध्वजाला अभिवादन केले.भूषण वेताळ, आनंद बनसोडे, तुषार पवार हे गिर्यारोहक देखील मोहिमेत सहभागी झाले आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या