Asian Games 2018 : सिंधूची गोल्डसाठी लढत, साईनाला ब्रॉंझ

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

शियाई क्रिडा स्पर्धेत भारताच्या पी व्हि सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-15, 21-10 असे तीन गेममध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची फुलराणी साईना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत बॅडमिंटन एकेरीमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याची कामगिरी साईनाने केली आहे. 

जकार्ता : आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताच्या पी व्हि सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-15, 21-10 असे तीन गेममध्ये पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची फुलराणी साईना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत बॅडमिंटन एकेरीमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देण्याची कामगिरी साईनाने केली आहे. 

सिंधूने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिला गेम चार गुणांनी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू सुरवातीला आघाडीवर होती त्यानंतर मात्र यामागुचीने आक्रमक खेळ करत दुसरा गेम 21-15 असा जिंकला आणि सामन्यात पुनरागमन केले. तिसरा गेम सुरु झाल्यावर यामागुची आणि सिंधू यांनी पहिले तीन गुण बरोबरी साधली. त्यानंतर मात्र सिंधूने प्रचंड आक्रमक खेळ केला. तिने पुढील तीन गुण जोरदार स्मॅश मारत मिळवले. निर्णायक गेममध्ये बऱ्याच वेळा झालेल्या मोठ्या रॅलींमध्ये सिंधूने कौशल्याने बाजी मारली. 

साईनाला चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगने सरळ गेममध्ये 21-17,21-14 असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या त्झुंयिंगला साईनाने कडवी झुंज दिली मात्र तिला सामन्यात पुनरागमन करण्यात अपयश आल्याने तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. साईनाची प्रतिस्पर्धी 24 वर्षांची असून साईनाचे वय 36 वर्षे आहे. वाढत्या वयामुळे तिला हालचाली करण्यात अडचण येत होती.    


​ ​

संबंधित बातम्या