Schoolympics 2019 : कांबळे-कदम, भुरत-नायर पुढील फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे. 

कोल्हापूर - मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात सुप्रीत हलगली व राधिका काणे, जयप्रकाश जकोटिया व श्रुती शंकरगौडा, ऋषीकेश कांबळे व स्नेहा कदम, स्वरूप पाटील व मानसी दड्डी, तर सोळा वर्षांखालील गटात सम्यक्‌ लोढा व मृण्मयी शिरसाट, मिहिर भुरत व अदिती नायरने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा दिलीप देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू आहे. 

निकाल असा : १४ वर्षांखालील - सुप्रीत हलगली व राधिका काणे (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. विजयशक्ती नायडू व आसावरी चव्हाण (महावीर इंग्लिश), जयप्रकाश जकोटिया व श्रुती शंकरगौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. सोहम शेख व वैष्णवी पाटील (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम), ऋषीकेश कांबळे व स्नेहा कदम (सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक) वि. वि. साई नागेशकर व रेणू कुलकर्णी (माईसाहेब बावडेकर),  स्वरूप पाटील व मानसी दड्डी (सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक) वि. वि. शंकर ढवळ व जीवल फडणीस (माईसाहेब बावडेकर). १६ वर्षांखालील - सम्यक्‌ लोढा व मृण्मयी शिरसाट (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. पार्थ गुणे व सुहानी नरसिंघाणी (माईसाहेब बावडेकर), मिहिर भुरत व अदिती नायर (संजय घोडावत इंटरनॅशनल, सीबीएसई) वि. वि. विराज थोरात व साची शहा (बावडेकर).


​ ​

संबंधित बातम्या