Schoolympics 2019 : न्यू मॉडेल, सुसंस्कार अंतिम फेरीत
. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही क्रिकेट स्पर्धा डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर सुरू आहे.
कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेत सुसंस्कार हायस्कूल व न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम फेरीत आज प्रवेश केला. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर सुरू आहे.
हनुमंतराव चाटे स्कूलने १८ षटकांत आठ गडी गमावून ८५ धावा केल्या. त्यांच्या दर्शन पाटीलने ३० धावा केल्या. सुसंस्कारकडून अभिषेक आंब्रेने दोन गडी बाद केले. सुसंस्कारने १० षटके व तीन चेंडूत ८६ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे दोन गडी बाद झाले. अदित्य पाटीलने नाबाद ३१ धावा केल्या. हनुमंतराव चाटे स्कूलकडून अदित्य खटावकरने एक गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलने २० षटकांत आठ गडी गमावून ११३ धावा केल्या. मनीत देंबडाने २७ धावा केल्या. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलकडून मतीन शेखने तीन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आयर्विनला २० षटकांत नऊ गडी गमावून १०६ धावा करता आल्या. त्यांच्या रोहित गिरीने ३० धावा केल्या. न्यू मॉडेलकडून अदिनाथ बोभाटेने तीन गडी
बाद केले.