Schoolympics 2019 : ‘सुसंस्कार’ विजेते

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्‍स क्रिकेट स्पर्धेतील रोमांचक सामन्यात सुसंस्कार हायस्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तृतीय क्रमांकाच्या लढतीत आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलने हनुमंतराव चाटे स्कूलवर मात केली. स्पर्धा कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर झाली.

न्यू मॉडेलने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ११० धावांचे आव्हान सुसंस्कारसमोर ठेवले. त्यांचे पाच गडी बाद झाले. ओम भेंडेने सर्वाधिक ३० धावा केल्या. सुसंस्कारकडून प्रथमेश साठेने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सुसंस्कारने १८ षटके व दोन चेंडूत ११४ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे पाच गडी बाद झाले. वरद माळीने २९ चेंडूत ३६ धावांची फलंदाजी करत सामन्यात योगदान दिले. न्यू मॉडेलकडून पार्थ दळवीने दोन गडी बाद केले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात आयर्विनने १७ षटकांत सहा गडी गमावून १०१ धावा केल्या. एकलव्य खाडेने ४० धावा ठोकल्या. हनुमंतराव चाटे स्कूलकडून आदित्य खटावकरने दोन गडी बाद केले. हनुमंतराव चाटे स्कूलला १७ षटकांत ८७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यांचे नऊ गडी बाद झाले. दर्शन निंबाळकरने १९ धावा केल्या. आयर्विनकडून रोहित गिरीने तीन गडी बाद केले.

​ ​

संबंधित बातम्या