Schoolympics 2019 : ग्रीन व्हॅली, प्रायव्हेट, न्यू होरायझन विजयी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

कोल्हापूर इंग्लिश, एकलव्य व जागृतीची प्रतिस्पर्ध्यांवर मात 

. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत ग्रीन व्हॅली, कोल्हापूर इंग्लिश, प्रायव्हेट, न्यू होरायझन, एकलव्य व जागृती हायस्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज पराभूत करत विजयी सलामी दिली. 
मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 निकाल असा : ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल वि. वि. संजीवन विद्यालय (टायब्रेकरवर ४-३, ग्रीनव्हॅलीकडून सिद्धेश जुगदार, साहिल भोसले, स्वयम शिंगाडे, अमय बरगे, तर संजीवनकडून प्रज्वल भोसले, अविनाश कोंजाळे, हर्षवर्धन भालकेचा गोल). कोल्हापूर इंग्लिश स्कूल वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल) (२-१, कोल्हापूर इंग्लिशकडून हर्ष छाबडा, तेजस सासने, तर यादव स्कूलकडून पार्थ रणवरेचा गोल). 
प्रायव्हेट इंग्लिश स्कूल वि. वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल (४-०, प्रायव्हेटकडून स्वयंम साळोखेची हॅटट्रिक, ओम लाडचा गोल). न्यू होरायझन स्कूल (सीबीएसई) वि. वि. श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय (३-०, न्यू होरायझनकडून निशांत हातरकीचे दोन, तर अनुप बनगेचा एक गोल). एकलव्य पब्लिक स्कूल वि. वि. दानोळी हायस्कूल (७-०, दिनेश कुचिकेरवीचे तीन, श्रवण साबळे व चेतन मुसळेचा प्रत्येकी एक गोल). जागृती हायस्कूल वि. वि. कोल्हापूर पब्लिक स्कूल (२-१, जागृतीकडून आरबाज शेख व अक्षय संभाजी, तर कोल्हापूरकडून अथर्व पाटीलचा गोल). ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूलला
पुढे चाल.


​ ​

संबंधित बातम्या