Schoolympics 2019 : उषाराजे, पोदार, शिवराज, देवाळे, यादव स्कूल विजयी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे.

कोल्हापूर - मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उषाराजे, पोदार, शिवराज, देवाळे, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा : उषाराजे हायस्कूल वि. वि. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) (६-०, उषाराजेकडून समृद्धी कटकळेची हॅट्ट्रिक, शाल्मली चव्हाण, सानिका पाटील व वैष्णव डोंबलेचा गोल). 
पोदार इंटरनॅशनल स्कूल वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (३-१, पोदारकडून आर्यन साठम, तृष्णा सरनाईक, भूमी खाडे, तर यादव स्कूलकडून स्नेहल नाईकचा गोल). शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम हायस्कूल (३-०, शिवराजकडून सिफा मुजावर, वैष्णवी पाटील व दीक्षा राशिवडेकरचा गोल). देवाळे विद्यालय वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) (१-०, देवाळेकडून सानिका पाटीलचा गोल). विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. रयत गुरुकुल पब्लिक स्कूल (२-१, यादव स्कूलकडून स्नेहल नाईकचे दोन, तर रयतकडून दीपशिखा सुतारचा गोल). उषाराजे हायस्कूल वि. वि. शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल (४-०, उषाराजेकडून आर्या मोरे व समृद्धी कटकोळेकडून प्रत्येकी दोन गोल). पोदार इंटरनॅशनल स्कूल वि. देवाळे विद्यालय यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. 


​ ​

संबंधित बातम्या