Schoolympics 2019 : महाराष्ट्र, न्यू मॉडेल, शाहू, डी. सी. नरके जिंकले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, न्यू मॉडेल, छत्रपती शाहू (सीबीएसई), व्ही. डी. शिंदे, डी. सी. नरके, छत्रपती शाहू (एसएससी), संजय घोडावत इंटरनॅशनल व महावीर इंग्लिश स्कूलने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना आज हरविले. सकाळ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

निकाल असा : महाराष्ट्र हायस्कूल वि. वि. विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल (२-०, महाराष्ट्रकडून संकेत साळोखे व मोहसीन बागवानचा गोल), न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल वि. वि. भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल (२-०, न्यू मॉडेलकडून प्रितम गुलेदचे दोन गोल), छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) वि. वि. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम हायस्कूल (१-०, शाहूकडून यश साळुंखेचा गोल), व्ही. डी. शिंदे हायस्कूल वि. वि. रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल (२-१, शिंदे हायस्कूलकडून मयूर गोरे व सुहास जगताप, तर रॉयलकडून प्रणव जाधवकडून गोल), डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज वि. वि. विबग्योर (२-०, नरके विद्यानिकेतनकडून प्रथमेश बाटेचे दोन गोल), छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) वि. वि. नागोजीराव पाटणकर हायस्कूल (३-०, शाहूकडून स्वरूप पाटील, अादित्य कल्लोळी, हुजेफा मोमीनचा गोल), संजय घोडावत स्कूल (सीबीएसई) वि. वि. ॲड. पी. आर. मुंडरगी इंग्लिश मीडियम स्कूल (२-०, घोडावत स्कूलकडून द्वीप दोशी व अमनुल्ला मणियारचा गोल), महावीर इंग्लिश स्कूल वि. वि. ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (३-०, रुद्र पाटील, देवाशिष सरनोबत, अथर्व दिघेचा गोल).

​ ​

संबंधित बातम्या