Schoolympics 2019 : देवाळे हायस्कूलचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. पोलो मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीत देवाळे हायस्कूलने विजयादेवी इंग्लिश मीडियम स्कूलवर आज मात केली. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) व संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला (सीबीएसई) प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल मिळाली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. पोलो मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

देवाळे स्कूल विरुद्ध विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यात सामना झाला. देवाळेकडून दीक्षा सराटेने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघास विजयी केले. छत्रपती शाहू विद्यालयाविरुद्धच्या सामन्यात रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल, तर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलविरुद्धच्या सामन्यात रॉयल गुरुकुल पब्लिक स्कूल मैदानात हजर राहिले नाही.


​ ​

संबंधित बातम्या