Schoolympics 2019 : लोहिया-संजीवन यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ’ माध्यम समूह प्रस्तूत ही स्पर्धा असून, छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात स. म. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय विरुद्ध संजीवन पब्लिक स्कूल यांच्यातील सामना आज गोलशून्य बरोबरीत राहिला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ’ माध्यम समूह प्रस्तूत ही स्पर्धा असून, छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे. 
लोहिया हायस्कूल विरुद्ध संजीवन यांच्यातील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी चांगला खेळ केला. पूर्णवेळेत मात्र खेळाडूंना गोल करता आला नाही. परिणामी सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. अन्य सामन्यात प्रायव्हेट इंग्लिश स्कूलविरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल, डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन विरुद्ध ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल, तर जागृती हायस्कूलविरुद्ध एकलव्य पब्लिक स्कूल उपस्थित न राहिल्याने त्यांना पुढे चाल 
देण्यात आली.


​ ​

संबंधित बातम्या