Schoolympics 2019 : सेंट झेवियर्स, लोहिया विजयी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स, शांतिनिकेतन, प्रायव्हेट, एस. एम. लोहिया, एकलव्य, जागृती हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली.

कोल्हापूर - मॅप्रो स्कूलिंपिक्‍स फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स, शांतिनिकेतन, प्रायव्हेट, एस. एम. लोहिया, एकलव्य, जागृती हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. ओरिएंटल इंग्लिश व संजीवन पब्लिक स्कूलला प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल मिळाली. प्रायव्हेटच्या स्वयम साळोखे, तर एस. एम. लोहिया हायस्कूलच्या मानव हराळेने हॅट्‌ट्रिक नोंदवली.

निकाल असा : सेंट झेवियर्स हायस्कूल वि. वि. कोल्हापूर इंग्लिश स्कूल (३-०, ‘झेवियर्स’कडून साद सनदी, कुणाल पवार, फरहान मकानदारचा गोल), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन वि. वि. चाटे स्कूल (५-०, ‘शांतिनिकेतन’कडून प्रीत सोळंकी, आयुष पाटील, पद्मराज पाटीलचा गोल), प्रायव्हेट वि. वि. संजीवन (३-०, प्रायव्हेटच्या स्वयम साळोखेची हॅट्ट्रिक), एस. एम. लोहिया हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज वि. वि. न्यू होरायझन स्कूल (सीबीएसई) (३-०, एस. एम. लोहियाकडून मानव हराळेची हॅट्ट्रिक), एकलव्य पब्लिक स्कूल वि. वि. अल्फान्सो स्कूल (३-०, चेतन मुसळे, प्रेम मारकद, अथर्व चव्हाणचा गोल), जागृती हायस्कूल वि. वि. हनुमंतराव चाटे स्कूल (४-०, ‘जागृती’कडून अरबाज शेखचे दोन, प्रथमेश भांदुगरे व साहील बेळगावीचा गोल).


​ ​

संबंधित बातम्या