Schoolympics 2019 : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पूर्णा पाटीलला चार सुवर्ण
बारा वर्षाखालील मुलींच्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पूर्णा पाटीलने चार सुवर्ण, चौदा वर्षाखालील गटात
मेघल मंडलिक तीन सुवर्ण, तर सोळा वर्षाखालील गटात तनिष्का भोसलेने तीन सुवर्णपदके पटकाविली.
कोल्हापूर : बारा वर्षाखालील मुलींच्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पूर्णा पाटीलने चार सुवर्ण, चौदा वर्षाखालील गटात मेघल मंडलिक तीन सुवर्ण, तर सोळा वर्षाखालील गटात तनिष्का भोसलेने तीन सुवर्णपदके पटकाविली. प्रणिती पंडितराव, मधुरा जाधव, श्रद्धा पाटील, स्वरदा नाईक, सृष्टी ढोलेने यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. मॅप्रो स्कूलिंपिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा केएसएच्या जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये झाली.
निकाल अनुक्रमे असा :
१२ वर्षाखालील -
रिदमिक - रिबन : पूर्णा पाटील (सेंट झेवियर्स हायस्कूल), शर्वरी सुर्वे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), रूचा कागदे (छत्रपती शाहू विद्यालय). रिदमिक-बॉल - प्रणिती पंडितराव (होलीक्रॉस कॉन्व्हेंट), पूर्णा पाटील, तन्वी नागराळे (अल्फान्सो स्कूल). रिदमिक-हूप - पूर्णा पाटील, ॲग्नेस जॉन्सन (छत्रपती शाहू विद्यालय), रूचा कागदे (छत्रपती शाहू विद्यालय). रिदमिक-क्लब - पूर्णा पाटील, तृप्ती निकम (छत्रपती शाहू विद्यालय), स्वस्ती फणसाळकर (छत्रपती शाहू विद्यालय).
ओव्हरऑल - पूर्णा पाटील, रूचा कागदे, प्रणिती पंडितराव.
१४ वर्षाखालील -
रिदमिक-रिबन - मेघल मंडलिक (न्यू इंग्लिश मीडियम स्कूल), योगिता शिंदे (लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), मधुरा जाधव (छत्रपती शाहू विद्यालय). रिदमिक बॉल - मधुरा जाधव, प्राजल बोरा (छत्रपती शाहू विद्यालय), मेघल मंडलिक. रिदमिक हूप - मेघल मंडलिक, श्रद्धा पाटील (फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी), सोनाली वडगावकर (छत्रपती शाहू विद्यालय). रिदमिक क्लब - श्रद्धा पाटील (फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमी), सोनाली वडगावकर, मधुरा जाधव. ओव्हरऑल - मेघल मंडलिक, मधुरा जाधव, श्रद्धा पाटील.
१६ वर्षाखालील -
रिदमिक रिबन - स्वरदा नाईक (छत्रपती शाहू विद्यालय), तनिष्का भोसले (प्रायव्हेट हायस्कूल), श्रद्धा केणे (छत्रपती शाहू विद्यालय). रिदमिक बॉल - तनिष्का भोसले, सृष्टी ढोले (छत्रपती शाहू विद्यालय), स्वरदा नाईक. रिदमिक हूप - तनिष्का भोसले, सृष्टी ढोले, स्वरदा नाईक. रिदमिक क्लब - सृष्टी ढोले, श्रद्धा केणे, तनिष्का भोसले. ओव्हरऑल - तनिष्का भोसले, सृष्टी ढोले, स्वरदा नाईक.