schoolympics 2019 : स्वानंद मगदूमचा सुवर्णपदकांचा चौकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा केएसएच्या जिम्नॅस्टिक्‍स हॉलमध्ये झाली.

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलांच्या जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत शांतिनिकेतनच्या स्वानंद मगदूमने सुवर्णपदकांचा चौकार ठोकला. मयूरेश माने, श्रीनाथ जुगदार, अन्वेश पोरे यांनी विविध प्रकारांत सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा केएसएच्या जिम्नॅस्टिक्‍स हॉलमध्ये झाली.

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) ः

आर्टिस्टिक-पॅरेलल बार : मयूरेश माने (विद्यापीठ), श्रीनाथ जुगदार (प्रायव्हेट), उत्कर्ष देसाई (महाराष्ट्र). रोमन रिंग : श्रीनाथ जुगदार, उत्कर्ष देसाई, अन्वेश पोरे. पोमेल हॉर्स - स्वानंद मगदूम, श्रीनाथ जुगदार, उत्कर्ष देसाई.  हॉरिझोंटल बार : अन्वेश पोरे, स्वानंद मगदूम, श्रीनाथ जुगदार. व्हॉल्टिंग हॉर्स - स्वानंद मगदूम, अन्वेश पोरे, उत्कर्ष देसाई. फ्लोअर एक्‍सरसाईज - स्वानंद मगदूम, उत्कर्ष देसाई, सोहम नागदेव. ओव्हरऑल - स्वानंद, उत्कर्ष, अन्वेश.


​ ​

संबंधित बातम्या