Schoolympics 2019 : तृप्तीने पटकावली  दोन सुवर्णपदके 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत केएसएच्या जिम्नॅस्टिक्‍स हॉलमध्ये जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा झाली. 

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलींच्या जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत छत्रपती शाहू विद्यालयाच्या (एसएससी) तृप्ती निकमने दोन सुवर्णपदके पटकावली. ऋचा कागदे, नयन शिंदे, नूपुर पोवारने सुवर्णपदकांची कमाई केली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत केएसएच्या जिम्नॅस्टिक्‍स हॉलमध्ये जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

बॅलेन्सिंग बीम - ऋचा कागदे (छत्रपती शाहू, सीबीएसई), प्रणिती पंडितराव (होलीक्रॉस कॉन्व्हेंट), इंद्रजा बिरंजे (छत्रपती शाहू, एसएससी). व्हॉल्टिंग हॉर्स - नयन शिंदे (छत्रपती शाहू, एसएससी), तृप्ती निकम, तन्वी नागराळे (अल्फान्सो). अनइव्हन बार - नूपुर पोवार (होलिक्रॉस कॉन्व्हेंट), शर्वरी सुर्वे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स), इंद्रजा बिरंजे. फ्लोअर एक्‍सरसाइज - तृप्ती निकम, अनुश्री यादव (प्रायव्हेट), परिणिता पाटील (चाटे स्कूल सेकंडरी). ओव्हरऑल - तृप्ती निकम, नयन शिंदे, प्रणिती पंडितराव.


​ ​

संबंधित बातम्या