Schoolympics 2019 : उषाराजे, न्यू इंग्लिशची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर हॉकी स्पर्धेस आज सुरवात झाली. 

कोल्हापूर - मुलींच्या हॉकी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आणि उषाराजे हायस्कूलने आज विजयी सलामी दिली. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर हॉकी स्पर्धेस सुरवात झाली. 
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने ज्योतिर्लिंग विद्यामंदिरवर ३-० ने मात केली. 

दुसऱ्या सामन्यात न्यू इंग्लिशने सी. बी. पाटील विद्यालयाला २-०ने पराभूत केले. उषाराजे हायस्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलला २-०ने पराभूत केले. बळवंतराव यादव हायस्कूल विरुद्ध विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल, तर सी. बी. पाटील विरुद्ध 
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.


​ ​

संबंधित बातम्या