Schoolympics 2019 : नरके, संजीवन, न्यू इंग्लिश, आदर्श विजयी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाने दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरचा ८-०ने धुव्वा उडवला. संजीवन पब्लिक स्कूलने श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलवर ५-०ने मात केली.

कोल्हापूर - मुलांच्या हॉकी स्पर्धेत डी. सी. नरके, संजीवन, न्यू इंग्लिश, एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर आज मात केली. हॉकी स्पर्धेस आज सुरवात झाली. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाने दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरचा ८-०ने धुव्वा उडवला. संजीवन पब्लिक स्कूलने श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलवर ५-०ने मात केली. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने संजीवन विद्यानिकेतनला ७-०ने पराभूत केले. एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने दत्ता बाळ इंग्लिश मीडियम स्कूलला ३-०ने हरविले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध दत्ताबाळ हायस्कूल व श्रीमंत जयसिंगराव घाटगे विरुद्ध बळवंतराव यादव हायस्कूल यांच्यातील सामना गोलशून्य, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल विरुद्ध दत्ता बाळ प्राथमिक विद्यामंदिर यांच्यातील सामना १-१ने बरोबरीत राहिला.


​ ​

संबंधित बातम्या