Schoolympics 2019 : मुलांच्या गटात ‘नरके’ची बाजी
कोल्हापूर - मुलांच्या हॉकी स्पर्धेत कुडित्रेच्या डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले होते. ‘सकाळ माध्यम समूह’प्रस्तुत ही स्पर्धा आहे.

डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज विरुद्ध पन्हाळ्याच्या संजीवन पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना झाला. नरके विद्यानिकेतनकडून ओम खोतने नवव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. पूर्णवेळेत संजीवनच्या खेळाडूंना गोलची बरोबरी साधता आली नाही. तृतीय क्रमांकाच्या लढतीत दत्ताबाळ हायस्कूलने एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजविरुद्ध बाजी मारली.
दत्ताबाळ हायस्कूलने एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतनवर १-०ने मात केली. त्यांच्या अर्जुन हारगुडेने गोल नोंदवून संघाला विजयी केले. डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजचा
विजेता संघ असा : शुभम बागीम, अनुरूप देसाई, शुभम डुबल, विनायक हांडे, ऋतुराज कदम, गुरूनाथ कारंडे, ओम खोत, आदित्य माळी, सुयश नेपिरे, आदित्य पाटील, हर्षवर्धन पाटील, पारस पाटील, साहील पाटील, सिद्धेश पाटील, स्वप्नील पाटील, यशराज पाटील, प्रथमेश
शियेकर, करण तळप.