Schoolympics 2019 : घाटगे, देवाळे विद्यालय विजयी संजीवन, नरके विद्यानिकेतनची विजयी आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा

व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीमंत जयसिंगराव घाटगे, देवाळे विद्यालय संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला.

कोल्हापूर, ता. २० : मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात श्रीमंत जयसिंगराव घाटगे, देवाळे विद्यालय संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. तर मुलांच्या गटात पन्हाळा विद्यामंदिर, एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, संजीवन पब्लिक स्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पन्हाळा येथील मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 निकाल असा :

मुली - श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल (कागल) वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (म्हाळुंगे) (२-०), देवाळे विद्यालय (देवाळे) वि. वि. हनुमंतराव चाटे स्कूल (शाहूपुरी) (२-०), देवाळे विद्यालय (देवाळे) वि.वि. न्यू होरायझन स्कूल (गडहिंग्लज) (२-०), न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (बाचणी), न्यू होरायझन स्कूल (गडहिंग्लज), श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूलला प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल. 

मुले - पन्हाळा विद्यामंदिर (पन्हाळा) वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (म्हाळुंगे) (२-०), 
एम. जी. पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज (मिणचे) वि. वि. छत्रपती शाहू विद्यालय (२-०), संजीवन पब्लिक स्कूल (पन्हाळा) वि. वि. डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज (कुडित्रे) (२-०), डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज (कुडित्रे) वि. वि. छत्रपती शाहू विद्यालय (२-०), न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल (कोल्हापूर), विलासराव कोरे हायस्कूलला 
पुढे चाल.


​ ​

संबंधित बातम्या