Schoolympics 2019 : बाचणीच्या ‘न्यू मॉडेल’ची विजेतेपदाला गवसणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा पन्हाळ्यावर झाली. पन्हाळा विद्यामंदिरच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले होते. 

कोल्हापूर - मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत बाचणीच्या न्यू मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने देवाळे विद्यालयाचा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा पन्हाळ्यावर झाली. पन्हाळा विद्यामंदिरच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले होते. 

अंतिम सामन्यात न्यू मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने देवाळे विद्यालयाचा २५-२२, २५-२१ सेटने पराभव केला. तृतीय क्रमांकाच्या लढतीत उषाराजे हायस्कूलने गडहिंग्लजच्या न्यू होरायझन स्कूलला (सीबीएसई) २५-१२, २५-१० सेटने पराभूत केले. 

तत्पूर्वीच्या उपांत्य फेरीतील लढतीत देवाळे विद्यालयाने उषाराजे हायस्कूलचा २५-१४, २५-२ सेटने पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने न्यू होरायझन स्कूलला २५-६, २५-७ सेटने पराभूत केले.  


​ ​

संबंधित बातम्या