Schoolympics 2019 : सिद्धेश, अभंग, सोमनाथ, शौर्याला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ज्यूदो स्पर्धा येथे झाली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन केले होते. 

कोल्हापूर - वर्षांखालील मुलांच्या ज्यूदो स्पर्धेत अभंग फडणीस, सोमनाथ कमलदिनी, सिद्धेश गंडमाळे, शौर्या पाटोळे यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. 

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत ज्यूदो स्पर्धा येथे झाली. ‘सकाळ माध्यम समूह’ प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पर्धेचे आयोजन केले होते. 

निकाल अनुक्रमे असा :

२५ किलो ः अभंग फडणीस (विबग्योर). ३० किलो ः सोमनाथ कमलनिधी (रत्नाप्पा कुंभार हायस्कूल), ओम तांबट (विमला गोएंका इंग्लिश मीडियम स्कूल), आयुष अपराध (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल), अथर्वराज मुगडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज). ३५ किलो ः सिद्धेश गंडमाळे (प्रायव्हेट हायस्कूल), सूरज पाटील (नेहरू विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज), शिवम भोसले (संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल), समर्थ रणदिवे (विबग्योर). ३५ किलोवरील ः शौर्या पाटोळे (सेंट झेवियर्स हायस्कूल), यश जाधव (पोदार इंटरनॅशनल स्कूल), रणवीर वाघमारे (लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल), निहार परीट (ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज हायस्कूल).


​ ​

संबंधित बातम्या