Schoolympics 2019 : मानसी, प्रणोती, सोनालीला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्यूदो स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूहप्रस्तुत ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली. 

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलींच्या ज्यूदो स्पर्धेत मानसी गाडीवडर, प्रणोती मोरे, वैष्णवी पाटील, सोनाली पाटील, संस्कृती पाटील, साक्षी वाटमारे, हर्षदा सावंत यांनी आपापल्या वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत ज्यूदो स्पर्धा झाली. सकाळ माध्यम समूहप्रस्तुत ही स्पर्धा शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झाली. 

निकाल अनुक्रमे असा :

४० किलो- मानसी गाडीवडर (संजीवन पब्लिक  स्कूल), वैष्णवी पाटोळे (सेंट झेव्हियर्स हायस्कूल), वैष्णवी पाटील (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल), वैष्णवी भोकरे (महाराष्ट्र हायस्कूल). ४४ किलो- प्रणोती मोरे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल), साक्षी सुतार (वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), वैष्णवी मुळे (संजीवन पब्लिक स्कूल). ४८ किलो- वैष्णवी पाटील (श्री साई हायस्कूल), श्रद्धा परीट (नेहरू विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज), आदिती पाटील (एम. एल. जी. गर्ल्स हायस्कूल), पायल बेंद्रे (संजीवन पब्लिक स्कूल). ५२ किलो- सोनाली पाटील (गारगोटी हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज), श्‍वेता मोरे (संजीवन पब्लिक स्कूल), सायमा पखाली (एम. एल. जी. हायस्कूल). ६३ किलो- संस्कृती पाटील (नेहरू विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज), रिया गाढवे (संजीवन पब्लिक स्कूल). ७० किलो - साक्षी वाटमारे (संजीवन पब्लिक स्कूल), ७० किलोवरील- हर्षदा सावंत (संजीवन पब्लिक स्कूल).


​ ​

संबंधित बातम्या