Schoolympics 2019 : ‘नागनाथ, घोडावत, वारणा’चे झटपट विजय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. 

कोल्हापूर - मुलांच्या कबड्डीत बाद फेरीत नागनाथ, संजय घोडावत इंटरनॅशनल, डी. सी. नरके, नागोजीराव पाटणकर, वारणा, रामचंद्र पाटील, वालावलकर, शांतिनिकेतन, राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहे. 

निकाल असा :

नागनाथ विद्यालय वि. वि. विलासराव कोरे हायस्कूल (३९-१६), संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) वि. वि. न्यू इंग्लिश स्कूल (२७-१०), डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय वि. वि. बळवंतराव यादव हायस्कूल (२४-१५), नागोजीराव पाटणकर हायस्कूल वि. वि. दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर (३१-२१), वारणा विद्यानिकेतन वि. वि. संजीवन पब्लिक स्कूल (२२-१२), रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय वि. वि. आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल (२५-३), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. कौतुक विद्यालय (२९-१२), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन वि. वि. आनंद सेमी इंग्लिश स्कूल (२९-१२), नागनाथ विद्यालय वि. वि. दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल (२४-४), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. वसंतराव देशमुख हायस्कूल (२९-१). 

वारणा विद्यानिकेतन, न्यू प्राथमिक विद्यालय, अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम हायस्कूल, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल व दत्ताबाळ हायस्कूलला प्रतिस्पर्धी संघ न आल्याने पुढे चाल मिळाली.
 


​ ​

संबंधित बातम्या