Schoolympics 2019 : शाहू, नागनाथ, नरके उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

कोल्हापूर - मुलांच्या कबड्डी स्पर्धेत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, नागनाथ विद्यालय, शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल, डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. लिटल फ्लॉवर, शांतिनिकेतन, वारणा, वालावलकर, अल्फान्सो संघाने साखळी फेरीत प्रतिस्पर्ध्यांना हरविले. 
मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. ‘सकाळ’ माध्यम समूह प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

उपांत्यपूर्व फेरीतील निकाल असा :

राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन ॲण्ड निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय (३३-१७), नागनाथ विद्यालय वि. वि. अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (२८-१४), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (२९-१४), डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने (सीबीएसई) (२५-२१). साखळी फेरी : लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल वि. वि. नागोजीराव पाटणकर हायस्कूल (२१-१७), डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन वि. वि. दत्ताबाळ हायस्कूल (३१-१४), वारणा विद्यानिकेतन वि. वि. रामचंद्र बाबूराव पाटील विद्यालय (३०-२८), डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय वि. वि. न्यू प्राथमिक विद्यालय (३४-१), शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल वि. वि. अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (३७-२०), नागनाथ विद्यालय वि. वि. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) (४५-२९), राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला वि. वि. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) (३१-१०), डी. सी. नरके विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय वि. वि. वारणा विद्यानिकेतन (२७-१८), अल्फान्सो स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वि. वि. लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल (२४-५).

​ ​

संबंधित बातम्या