Schoolympics 2019 : मानसी, गौरी, ऐश्‍वर्या, सिद्धी, वैष्णवीला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलींच्या नेमबाजी स्पर्धेत मानसी सावंत, गौरी साळोखे, तर १६ वर्षांखालील गटात ऐश्‍वर्या पोवार, सिद्धी पाटील, वैष्णवी राजे हिने सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :

१४ वर्षांखालील ः ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः मानसी सावंत (लिटल फ्लॉवर इंग्लिश), सलोनी विभुते (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स). एअर पिस्टल १० मीटर ः गौरी साळोखे (प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स), यशस्वी पोवार (राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम), अदिती काळे (लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम). 
१६ वर्षांखालील ः पीप साईट एअर रायफल १० मीटर ः ऐश्‍वर्या पोवार (उषाराजे), श्रावणी पोवार (उषाराजे). ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः सिद्धी पाटील (वसंतराव देशमुख), वेदिका लाड (छत्रपती शाहू, एसएससी). एअर पिस्टल १० मीटर ः वैष्णवी राजे (विबग्योर), मंजिरी वणिरे (पोदार इंटरनॅशनल), वेदिका रोकडे (राधाबाई शिंदे इंग्लिश 
मीडियम).


​ ​

संबंधित बातम्या