Schoolympics 2019 : अथर्व, अभिजित, अक्षयला विजेतेपद
आदित्य, रणवीर, समर्थनेही जिंकले जेतेपद
मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या नेमबाजी स्पर्धेत अथर्व बेलवाडीकर, अभिजित कांबळे, अक्षय कामत, तर १६ वर्षांखालील गटात अादित्य देसाई, रणवीर काटकर व समर्थ मंडलिकने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
निकाल अनुक्रमे असा (कंसात शाळा) :
१४ वर्षांखालील ः ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः अथर्व बेलवाडीकर (पोदार इंटरनॅशनल), राजवर्धन जगदाळे (चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स), ऋषीकेश बोंगाळे (होलीडेन इंग्लिश मीडियम). पीप साईट एअर रायफल १० मीटर ः अभिजित कांबळे (महाराष्ट्र), राजवर्धन पाटील (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम), प्रद्युम्न पाटील (आदर्श गुरुकुल विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज). एअर पिस्टल १० मीटर ः अक्षय कामत (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), अथर्व भिवसे (सेंट झेवियर्स), आरमान अरवाडे (डी. सी. नरके विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज).
१६ वर्षांखालील ः ओपन साईट एअर रायफल १० मीटर ः अादित्य देसाई (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम), समर्थ पाटील (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), अथर्व आंग्रे (विद्यापीठ हायस्कूल). पीप साईट एअर रायफल १० मीटर ः रणवीर काटकर (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), प्रियांशू बेदरे (सेव्हंथ डे ॲडव्हेंटिस्ट), प्रसाद भोसले (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी). एअर पिस्टल १० मीटर ः समर्थ मंडलिक (महाराष्ट्र), अथर्व निंबाळकर (व्यंकटेश इंग्लिश), मोहम्मदशफीन शेख (अल्फान्सो).