Schoolympics 2019 : ऋषिकेश, आर्यन, सोहन, यशराजचा डबल धमाका 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

बारा वर्षांखालील मुलांच्या स्केटिंग स्पर्धेत ऋषिकेश सरकार, आर्यन धनवडे, तर सोळा वर्षांखालील गटात सोहन सावंत व यशराज पोरेने दुहेरी मुकुट पटकाविला. चौदा वर्षांखालील गटात ऋषीकेश कुडाळकर, अर्पित जरग, साईशरण पाटील, साईश पोतदारने सुवर्णपदक मिळविले.

कोल्हापूर :बारा वर्षांखालील मुलांच्या स्केटिंग स्पर्धेत ऋषिकेश सरकार, आर्यन धनवडे, तर सोळा वर्षांखालील गटात सोहन सावंत व यशराज पोरेने दुहेरी मुकुट पटकाविला. चौदा वर्षांखालील गटात ऋषीकेश कुडाळकर, अर्पित जरग, साईशरण पाटील, साईश पोतदारने सुवर्णपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स स्केटिंग स्पर्धा न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या रिंगवर झाली. 

निकाल अनुक्रमे असा :

१२ वर्षाखालील मुले -

क्‍वॅड -  ५०० मीटर - ऋषिकेश सरकार (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), सोजल कांबळे (सर्वोदय विवेक जीवन विद्यालय पब्लिक स्कूल, गडहिंग्लज), साईराज डोंगळे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल).  १००० मीटर - ऋषिकेश सरकार, सत्यशील गवळी (साई इंग्लिश मीडियम स्कूल), साईराज डोंगळे. इनलाईन - ५०० मीटर - आर्यन शिवराज धनवडे (शांतिनिकेतन), मंदार यशवंत (दत्ताबाळ इंग्लिश मीडियम), गौरव नाईक (विबग्योर हायस्कूल). १००० मीटर - आर्यन धनवडे, गौरव नाईक. 

१४ वर्षाखालील मुले-

क्वॅड -  ५०० मीटर - ऋषिकेश कुडाळकर (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), स्मित पार्टे (सेंट झेवियर्स हायस्कूल), अर्पित जरग (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई).  १००० मीटर - अर्पित जरग, आदित्य कामगौडा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), प्रज्वल पाटील (संजीवन पब्लिक स्कूल). इनलाईन -  ५०० मीटर - 
साईशरण पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कृष्णा बन्सल ( विबग्योर हायस्कूल), ईशान इम्रान बागवान (पोदार इंटरनॅशनल स्कूल). १००० मीटर - साईश नितीन पोतदार (सर्वोदय विवेक जीवन विद्या पब्लिक स्कूल), साईशरण पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), कृष्णा बन्सल.

१६ वर्षाखालील मुले -

क्वॅड - ५०० मीटर - सोहन विक्रम सावंत (एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), सुजल पाटील (न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम), तनिष्क जैन (विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल). १००० मीटर -   सोहन सावंत, तनिष्क जैन. सुजल पाटील. इनलाईन - ५०० मीटर - यशराज पोरे (साई इंग्लिश मीडियम स्कूल), कल्प शहा (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), अल्पेश मोरे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल). इनलाईन - १००० मीटर - यशराज पोरे, कल्प शहा, अल्पेश मोरे.


​ ​

संबंधित बातम्या