Schoolympics 2019 : जय शहा, बालाजी पाटीलचा डबल धमाका
श्रीवर्धन, आर्यवीर पाटील, श्रावण पेठे, तेजस मानेनेही पटकाविले सुवर्ण..
मॅप्रो स्कूलिंपिक्स अंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा होत आहे.
कोल्हापूर - मुलांच्या जलतरण स्पर्धेत चौदा वर्षांखालील गटात जय शहा, तर सोळा वर्षांखालील गटात बालाजी पाटीलने दोन सुवर्णपदके पटकाविली. बारा वर्षांखालील मुलांच्या जलतरण स्पर्धेत श्रीवर्धन पाटील व आर्यवीर पाटील, चौदा वर्षांखालील श्रावण पेठे व सोळा वर्षांखालील गटात तेजस मानेने सुवर्णपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स अंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा होत आहे.
निकाल अनुक्रमे असा :
१२ वर्षांखालील - ४ बाय ५० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - आरुष बोंद्रे, रणवीर चव्हाण, विश्वजित कमलाकर, समर्थ वाघमोडे. १०० मीटर फ्री स्टाईल - श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स), साहील शेळके (छत्रपती शाहू, एसएससी), आर्यवीर पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज, शांतिनिकेतन). ५० मीटर ब्रेक स्ट्रोक - आर्यवीर पाटील, पृथ्वीराज इंगळे (छत्रपती शाहू, सीबीएसई), श्रीवर्धन पाटील (सेंट झेवियर्स). १४ वर्षांखालील - ४ बाय ५० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - रोहन हिटमलानी, मोहित जाधव, हर्षवर्धन जिरगे, अरुण कदम. भाई सी. बी. पाटील विद्यालय - ओमकार पाटील, सिद्धेश पाटील, सुहास पाटील, साहील शिंदे. १०० मीटर फ्री स्टाईल - श्रावण पेठे (छत्रपती शाहू, एसएससी), चिन्मय सूर्यवंशी (सेंट झेवियर्स), तनिष्क आयरे (महाराष्ट्र). १०० मीटर बॅकस्ट्रोक - जय शहा (छत्रपती शाहू, सीबीएसई), पार्थ काटे (छत्रपती शाहू, सीबीएसई), तनिष्क आयरे. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक - जय शहा, पुष्कर गवळी (लक्ष्मीबाई जरग), तनिष्क आयरे.
१६ वर्षांखालील - ४ बाय १०० मीटर रिले फ्री स्टाईल - संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) - पृथ्वीराज चव्हाण, अमेय धुपकर, पृथ्वीराज कराडे, यश पाटील. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) - प्रतीक बेडेकर, आर्जव पाटील, स्वरूप पाटील, आर्यन फडतारे. १०० मीटर फ्री स्टाईल - बालाजी पाटील (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज, शांतिनिकेतन), तेजस माने (रॉयल इंग्लिश मीडियम), सूर्याजी बोडके (विमला गोएंका इंग्लिश). १०० मीटर बॅक स्ट्रोक - तेजस माने, सुजल पाटील (हनुमंतराव चाटे), अमेय धुपकर. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक - बालाजी पाटील, इंद्रजित परमेकर (विमला गोएंका),
ओमकार इंगळे (अल्फान्सो).