Schoolympics 2019 : अस्मी देसाईचा सुवर्णपदकांचा चौकार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 December 2019

संस्कृती आयरेने पटकावली दोन सुवर्णपदके

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा झाली. 

कोल्हापूर - मुलींच्या जलतरण स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात अस्मी देसाईने चार, तर १२ वर्षांखालील गटात संस्कृती आयरेने दोन सुवर्णपदके पटकावली. १४ वर्षांखालील गटात कृष्णा शेळके, समृद्धी जाधव व कयना मुजावरने सुवर्णपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत सागर पाटील जलतरण तलावावर ही स्पर्धा झाली. 

निकाल अनुक्रमे असा :

१६ वर्षांखालील : ४०० मीटर वैयक्तिक मिडले ः अस्मी देसाई (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन), लावण्या नलवडे (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल), जस्मीन जोहारी (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई). ५० मीटर बटरफ्लाय ः अस्मी देसाई, लावण्या नलवडे, निकिता पाटील (प्रायव्हेट हायस्कूल). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ः अस्मी देसाई, ऐश्‍वर्या डोंगरसाने (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), अदिती कुंभार (महावीर इंग्लिश स्कूल).

१२ वर्षांखालील : ५० मीटर बटरफ्लाय ः संस्कृती आयरे (महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज), अन्विता देशपांडे (अनंतराव भिडे विद्यामंदिर), इरा जामसांडेकर (डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतन). ५० मीटर फ्रीस्टाईल ः संस्कृती आयरे, अन्विता देशपांडे, वैदेही जर्दे (श्रीमंत माईसाहेब 
बावडेकर ॲकॅडमी). 

१४ वर्षांखालील : ५० मीटर बटरफ्लाय ः कृष्णा शेळके (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), धिरिजा मोरे (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल), कनम इंगवले (छत्रपती शाहू विद्यालय, सीबीएसई). १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ः समृद्धी जाधव (महाराष्ट्र हायस्कूल), कनम इंगवले, सायली पाटील (ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल). ५० मीटर फ्रीस्टाईल ः कयना मुजावर (सेंट झेवियर्स हायस्कूल), कृष्णा शेळके (छत्रपती 
शाहू विद्यालय, एसएससी), 
कनम इंगवले.


​ ​

संबंधित बातम्या