Schoolympics 2019 : निहाली, तनया, मधुरा, प्रिशा उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

नारायणी, सुहानी कुराडे, इशा, क्रितिकाचीही आगेकूच

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबलटेनिस हॉलमध्ये स्पर्धा झाली. 

 

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलींच्या टेबलटेनिस स्पर्धेत निहाली पाटील, तनया पाटील, चौदा वर्षांखालील गटात मधुरा रेवाळकर, नारायणी मुधोळकर, प्रिशा मुधाळे, तर सोळा वर्षांखालील गटात सुहानी कुराडे, इशा पाटील, क्रितिका वोराने उपांत्य फेरीत आज प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबलटेनिस हॉलमध्ये स्पर्धा झाली. 

निकाल असा : १२ वर्षाखालील - निहाली पाटील (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. वरदा पाटील (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी), तनया पाटील (चाटे स्कूल सेकंडरी) वि. वि. केतकी मिसाळ (श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी). १४ वर्षाखालील - मधुरा रेवाळकर (कोल्हापूर पब्लिक) वि. वि. भक्ती साठम (विमला गोएंका इंग्लिश मीडियम), नारायणी मुधोळकर (कोल्हापूर पब्लिक) वि. वि. मानवी तावणे (कोल्हापूर पब्लिक), प्रिशा मुधाळे (छत्रपती शाहू, सीबीएसई) वि. वि. रिया सारपे (विमला गोएंका इंग्लिश मीडियम). १६ वर्षाखालील - सुहानी कुराडे (सेंट झेवियर्स) वि. वि. महिमा चव्हाण (विमला गोएंका इंग्लिश मीडियम), इशा पाटील (होलीक्रॉस कॉन्व्हेंट) वि. वि. श्रेया पाटील (सेंट झेवियर्स), क्रितिका वोरा (विमला गोएंका इंग्लिश मीडियम) वि. वि. मानसी पाटील (पॅरामाऊंट इंग्लिश मीडियम).


​ ​

संबंधित बातम्या