Schoolympics 2019 : निहाली, नारायणी, सुहानी विजेती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबल-टेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोल्हापूर - बारा वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेबल-टेनिस स्पर्धेत निहाली पाटील, चौदा वर्षांखालील नारायणी मुधोळकर, तर सोळा वर्षांखालील गटात सुहानी कुराडेने विजेतेपद पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. केएसएच्या टेबल-टेनिस हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 निकाल असा : १२ वर्षांखालील - निहाली पाटील (विमला गोएंका) वि. वि. इरा वेंगुर्लेकर (शांतिनिकेतन) (११-६, ११-९, ११-८), तनया पाटील (चाटे स्कूल सेकंडरी). १४ वर्षांखालील - नारायणी मुधोळकर (कोल्हापूर पब्लिक) वि. वि. प्रिशा मुधाळे (छत्रपती शाहू, सीबीएसई) (११-७, १६-१४, ११-८), चिन्मयी खोत (कोल्हापूर पब्लिक). १६ वर्षांखालील - सुहानी कुराडे (सेंट झेवियर्स) वि. वि. दिशा देशपांडे (कोल्हापूर पब्लिक) (११-६, ११-८, ८-११, ११-७, ११-७), इशा पाटील (होलीक्रॉस कॉन्व्हेंट).


​ ​

संबंधित बातम्या