Schoolympics 2019 : अथर्व, दिनेश, पार्थ, आदित्यला सुवर्ण
Tuesday, 26 November 2019
आर्यन, साहिल, अथर्व, अनिष, वैभवनेही मारली सुवर्ण बाजी
सकाळ माध्यम प्रस्तुत शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात तायक्वाँदो स्पर्धा झाली.
कोल्हापूर - चौदा वर्षांखालील मुलांच्या तायक्वाँदो स्पर्धेत अथर्व कडके, दिनेश चौगले, पार्थ कदम, आदित्य मेथे, आर्यन कदम, साहिल ढोके, अथर्व शर्मा, अनिष पाटील व वैभव बोडकेने आपापल्या वजनगटांत सुवर्णपदक पटकाविले. मॅप्रो स्कूलिंपिक्स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. सकाळ माध्यम प्रस्तुत ही स्पर्धा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात तायक्वाँदो स्पर्धा झाली.