Schoolympics 2019 : अंकित, कुणाल अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

कोल्हापूर - सोळा वर्षांखालील मुलांच्या टेनिस स्पर्धेत अंकित भटेजा व कुणाल पवारने अंतिम फेरीत आज धडक मारली. 
मुलींच्या गटात सानिया मोरे व जरीन इनामदारने अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा सुरू आहे.

छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) अंकित भटेजाने घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) स्पंदन बरगेवर ८-४ गुणफरकाने मात केली. सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या कुणाल पवारने छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) प्रथमेश पाटीलला ८-३ गुणफरकाने हरविले. मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूलने सानिया मोरेने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या जरीन इनामदारवर ८-०, तर घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या (सीबीएसई) सोनल पाटीलने होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या मरियम शेखवर ८-० ने मात केली.

​ ​

संबंधित बातम्या